सोशल स्टार

Arya Jadhao: आर्याने केली बिगबॉसच्या घरातील सदस्यांची पोलखोल...

Published by : Team Lokshahi

विदर्भात राहणारी आर्या जाधव ही तिच्या टोपण नाव QK या नावाने देखील ओळखली जाते. आर्या जाधव ही मराठी तसेच हिंदी रॅप सॉंग्स लेखिका आहे . आजवर तिने अनेक रॅप सॉंग्स लिहलेले आहेत. तर तिच्या या प्रवासाची सुरुवात लोकप्रिय रियालिटी शो MTV हसल 2.0 या कार्यक्रमापासून झाली. तिने गायलेलं "द नऊवारी" रॅप संपूर्ण महाराष्ट्रभरात गाजलं ज्यामुळे तिने प्रचंड प्रसिद्धी मिळवली. यानंतर आर्याने थेट बिग बॉस मराठी 5च्या घरात प्रवेश केला. आर्या सुरुवातीला कोण्याच्या दिसण्यात येताना जरी दिसली नसली तरी पुढील काही आठवड्यांमध्ये आर्यामध्ये बदल होताना दिसून आला. आर्या स्वतःची बाजू निर्भीडपणे बिग बॉसच्या घरात मांडताना दिसून आली.

बिग बॉसमध्ये पुढे अशा काही घटना घडल्या ज्यामुळे आर्याला घरातून एक्झिट मारावी लागली. बिग बॉसच्या घरात आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्याचा प्रकार पाहायला मिळाला या प्रकारामुळे आर्यावर बिग बॉस मराठीचे चाहते खुश झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर आर्याच्या चाहत्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसली. मात्र या एका प्रकारामुळे आर्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले. यानंतर आर्याचे अमरावतीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले आणि आर्याचे कौतूक देखील करण्यात आले. याचपार्श्वभूमीवर आर्याने लोकशाही मराठीला भेट देऊन लोकशाही मराठीसह संवाद साधला आहे. ज्यामध्ये तिला काही प्रश्न करण्यात आले.

1. बिग बॉसच्या घरातून आर्याला मिळालेली ती मैत्रिण जिच्यासोबत आर्या बाहेर पडून देखील जवळीक साधून आहे.

2. आर्या तिच्या रागामुळे आज बिग बॉसच्या घरातून बाहेर आहे का? काय म्हणाली आर्या...

3. आर्या बी ग्रुपमध्ये असूनसुद्धा बी ग्रुप कधी तिचा झाला नाही का?

लोकशाही मराठीकडून आर्याला विचारण्यात आलेल्या "या" प्रश्नांवर आर्याने काय प्रतिक्रिया दिली हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

Mumbai Metro-3 | पहिली भूमिगत मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत;पहिल्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण

Navratri 2024: "या" कारणामुळे नवरात्री 9 दिवस साजरी केली जाते, जाणून घ्या...

Tripal Talaq: मुंबईतील ट्रिपल तलाक प्रकरण; तलाक प्रकरणातील आरोपीवर डोंबिवलीत गुन्हा

Rain Update: पुढील तीन तासात 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता; रेड अलर्ट जारी

Navratri 2024: नवरात्रीदरम्यान जवसाचे धान्य पेरण्या मागे काय आहे कारण; जाणून घ्या...